
दुसऱ्या महायुद्धात जपानच्या पराभवाच्या 80 व्या वर्षानिमित्त चीनची राजधानी बीजिंगमध्ये भव्य लष्करी परेडचे आयोजन करण्यात आले होते. चीन दरवर्षी 3 सप्टेंबर रोजी विजय दिन साजरा करतो. या दरम्यान, राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना तियानमेन स्क्वेअरवर परेडने सलामी दिली. त्यांनी या व्यासपीठावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा देत, जगात कोणाचीही दादागिरी सहन करणार नाही, असे खडेबोल सुनावले. तसेच चीन कोणाच्याही धमक्यांना घाबरणार नाही आणि आम्ही नेहमीच पुढे जात राहणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शी जिनपिंग यांनी अमेरिकेचे थेट नाव न घेता जागतिक शांतता आणि सहकार्यावर भर दिला. ते म्हणाले की मानवतेला शांतता किंवा युद्ध, वाटाघाटी किंवा संघर्ष आणि सर्वांसाठी फायदा किंवा तोटा यापैकी एक मार्ग निवडावा लागेल. आपण सर्व मानव एकाच ग्रहावर राहतो, म्हणून आपण एकत्र काम केले पाहिजे आणि शांतता राखली पाहिजे. हे जग जंगल राजात परत जाऊ नये. असे झाले तर मोठे देश लहान आणि कमकुवत देशांना धमकावत राहतात. आपण शांततेने पुढे जाण्याचा मार्ग अवलंबला पाहिजे आणि जागतिक शांतता आणि सौहार्दाचे रक्षण केले पाहिजे, असे ते म्हणाले.
शी जिनपिंग म्हणाले की मानवतेला शांतता किंवा युद्ध, वाटाघाटी किंवा संघर्ष आणि सर्वांसाठी फायदा किंवा तोटा यापैकी एक निवडावे लागेल. त्यांचे हे वक्तव्य अमेरिकेच्या टॅरिफबाबत असल्याचे मानले जात आहे. या परेडद्वारे अमेरिकेच्या विरोधकांनी एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले आहे.