तवांग चकमकीनंतर सीमाभागात ड्रोन, जेट्ससह तयार चीनचा काय आहे डाव? फोटो आले समोर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
china-bangda-airport

अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे झालेल्या चकमकीच्या काही दिवसांत हाय-रिझोल्यूशन उपग्रह प्रतिमा समोर आल्या आहेत की ज्यात चीनने हिंदुस्थानच्या ईशान्येकडील प्रमुख तिबेटी एअरबेसवर मोठ्या प्रमाणात ड्रोन आणि लढाऊ विमाने ठेवली आहेत. या द्वारे चीन हिंदुस्थानी सैन्याची तळ आणि एकूणच हालचालींवर नजर ठेवून असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

चीनच्या वाढत्या हवाई हालचालींमुळे अरुणाचल प्रदेशच्या भागात हिंदुस्थानी वायुसेने लढाऊ विमानांची हवाई गस्त वाढवली आहे. असे असताना मॅक्सरच्या प्रतिमा आल्या आहेत.

अरुणाचल प्रदेश सीमेच्या ईशान्येस 150 किमी अंतरावर असलेल्या चीनच्या बांगडा एअरबेसचा फोटो समोर आला आहे. ज्यामध्ये अत्याधुनिक WZ-7 ‘सोअरिंग ड्रॅगन’ ड्रोन दिसते आहे. 2021मध्ये प्रथमच अधिकृतपणे अनावरण करण्यात आलेले, सोअरिंग ड्रॅगन, जे 10 तासांपर्यंत न थांबता उड्डाण करू शकते. हे पाळत ठेवणे आणि शोध मोहिमांसाठी डिझाइन केलेले आहे आणि जमिनीवर लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी हे ड्रोन सक्षम असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदुस्थान या वर्गाचे कोणतेही ड्रोन चालवत नाही.

‘त्यांच्या इंडक्शन आणि ऑपरेशनल वापरावरून असे वाटत आहे की अक्साई चिनवर आणि ईशान्य हिंदुस्थानच्या प्रदेशातील मॅकमोहन रेषेच्या आसपासच्या मोहिमांना ताकद देण्यासाठी सक्रिय आणि पूर्णपणे अॅक्टिव्ह नेटवर्क वातावरण चीनकडून तयार केले गेले आहे’, अशी शक्यता समीर जोशी, माजी IAF पायलट यांनी व्यक्त केल्याचं NDTV च्या वृत्तात म्हटलं आहे.

बांगडा एअरबेसच्या 14 डिसेंबरच्या फोटोंमध्ये फ्लाइट-लाइनवर दोन फ्लँकर-प्रकारची लढाऊ विमाने देखील दिसतात. अशा लढाऊ विमानांची सीमेलगतच्या तळावरील उपस्थिती चीनच्या डावपेचांचा एक महत्त्वाचा भाग असण्याची देखील शक्यता वर्तवत आहे. यावर अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.