कोण ठरणार ‘चिंगारी स्टार’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या दोन वर्षात चिंगारी हे देशातील पहिले शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप बनवले आहे. क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सरसाठी कंपनीने अलीकडेच ‘चिंगारी स्टार’ स्पर्धेची घोषणा केली आहे. महिनाभर चालणा-या या स्पर्धेत विजेत्यांना एक कोटी किंमतीचे $GARI टोकन तसेच सहभागींना बक्षीस दिले जाईल. हे एकमेव असे ऍप आहे जे क्रिएटर्सना कॉन्टेन्ट क्रिएशनच्या साध्या माध्यमातून वेब 3.0 च्या दुनियेत घेऊन जाते आणि क्रिएटर्सना कॉन्टेन्टसाठी कमाईची संधी देते. $GARI हे सोशल टोकन युजर्स आणि क्रिएटर्सच्या ऍसेटवर नियंत्रण ठेवते. लवकरच $GARI चे पाठबळ घेऊन चिंगारीचे स्वतःचे एनएफटी मार्केटप्लेस असेल. जेथे क्रिएटर्स त्यांच्या व्हिडिओ मिंट करू शकतील आणि एनएफटीच्या माध्यमातून विकू शकतील.