
सामना प्रतिनिधी । चिरनेर
पनवेल तालुक्यातील चावंढोळी येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शेकपचा त्याग करून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण-पनवेल-खालापूरचे आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या उरण येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. संतोष दत्तात्रेय म्हात्रे, कुणाल म्हात्रे व ऋतिक जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षाच्या विचारांवर आणि जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्याने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे प्रवेशकर्त्यांनी सांगितले. जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांच्या हाती भगवा झेंडा हाती देत त्यांचे स्वागत केले. ज्या विश्वासाने आपण शिवसेनेत प्रवेश केला आहात त्याला कधीही तडा जाणार नाही अशी ग्वाही जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिली.



























































