हिमोग्लोबिन, मधुमेह, रोगप्रतिकारशक्ती आणि इतर अनेक आजारांवर गुणकारी कोथिंबीर

कोथिंबिरीचा वापर फक्त मसाल्यामध्ये किंवा पदार्थांच्या सजावटीकरिता आणि रुचकर होण्याकरिता नाही, तर तिच्यामध्ये बरेच औषधी गुणधर्म आहेत. यामुळे अन्नपदार्थाची चव वाढवण्याबरोबच शरीरातील अनेक आजारांवर रामबाण उपाय करणारी आहे. वाचा कोथिंबिरीचे औषधी गुणधर्म

आयर्न, मिनरल्स, जीवनसत्त्व ए, सी आणि अँण्टीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. शरीरातील रक्ताची कमतरता कोथिंबिरीचा आहारात वापर केल्याने भरून निघते. कोथिंबीर शीत गुणात्मक, पाचक, तृष्णाशामक आहे.

रोजच्या जेवणात कोथिंबिरीची चटणी खाल्ली असता अपचन, आम्लपित्त, पोटात गॅस होणे, अल्सर, मूळव्याध असे विकार होत नाहीत.

डोळ्यांची आग होणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, डोळे कोरडे होणे, क्षीण होणे अशा डोळ्यांच्या अनेक आजारांवर कोथिंबीर उपयोगी आहे.

शरीराराची रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच शरीराचा थकवा जाऊन उत्साह वाढविण्यासाठी 2 चमचे धणे व अर्धा इंच आलं एक ग्लास पाण्यात उकळावे व हे पाणी गूळ घालून आटवावे व तयार झालेला धण्याचा चहा प्यावा. हा चहा प्यायल्याने भूकसुद्धा वाढते.

अन्नपचन नीट न झाल्याने जर जुलाब होत असतील तर अशा वेळी धण्याचा ग्लासभर पाण्यात काढा करून प्यावा यामुळे जुलाब थांबतात.

आम्लपित्तामुळे घशामध्ये व छातीमध्ये जळजळ होत असेल व घशासी आंबटपाणी येत असेल तर एक चमचा धणेपूड व एक चमचा खडीसाखर (बारीक केलेली) यांचे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा घ्यावे यामुळे आम्लपित्ताचा त्रास कमी होतो.

आपली प्रतिक्रिया द्या