मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा 19 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद; कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी संभाजीनगर, अमरावती, नागपूर या विभागातील 19 जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद साधला आणि कोविड संदर्भात ते करीत असलेल्या उपाय योजना जाणून घेतल्या. यावेळी या गावाच्या सरपंचांनी कोविडचा मुकाबला ते कसे करीत आहेत, त्याबाबतची माहिती दिली.

संभाजीनगर विभागात संभाजीनगर – कुंभेफळ (संभाजीनगर). बीड – लुखेगाव (माजलगाव). जालना – रांजणी (घनसांवगी), जयपूर (मंठा). धाराशिव – शिंगोली (ता. धाराशिव). नांदेड – भोसी (भोकर). लातूर – सिकंदरपूर (लातूर), अलमला (औसा). परभणी – खडगाव (गंगाखेड). हिंगोली – मेठा (औंढा-नागनाथ) येथील संरपंचांनी उपाययोजनांची माहिती दिली.

नागपूर विभागात भंडारा –शहापूर (भंडारा). चंद्रपूर – जाम तकुम (पोंभुर्णा), राजगड (मुल). गोंदिया – करंजी (आमगाव). नागपूर – पिंपळगाव (हिंगणा), शिरपूर (नागपूर ग्रामीण) येथील संरपंच बैठकीत सहभागी झाले होते. तर अमरावती विभागातील अकोला – कापसी रोड (अकोला), अमरावती – धामणगाव बधे (मोताळा), यवतमाळ – अकोला बाजार (यवतमाळ), खडका (महागाव). वाशिम – गोवर्धन (ता. वाशिम) येथील सरपंचानी कोरोना उपाययोजनांची माहिती दिली.

यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार मुख्य सचिव सीताराम कुंटे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, पद्मश्री पोपटराव पवार, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ संजय ओक यांनी देखील आपले विचार मांडले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड उपस्थित होते.