
तौकते चक्रीवादळामुळे कोकणात झालेल्या नुकसानीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत पोहचले आहेत. रत्नागिरी विमानतळाशेजारी असलेल्या सभागृहात आढावा बैठक सुरू झाली असून जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी नुकसानीची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
तौकते चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सिंधुदुर्गात रवाना होणार आहेत






























































