
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील कामेश्र्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षीय विद्यार्थ्याने मानार नदीत उडी घेऊन नदीत बुडत असणाऱ्या 2 शाळकरी मुलांचा जीव वाचवला. या कार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते विधानभवन येथे कामेश्र्वरचा सत्कार करण्यात आला.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 14, 2020
फेब्रुवारी महिन्यात कंधीर शहरातील ओम मठपती, आदित्य दुडे आणि गजानन श्रीमंगले (सर्व 16 वर्षाचे) हे तिघे पोहण्यासाठी घोडज येथील ऑषी महाराज मंदिराशेजारील मान्याड नदी पात्रात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडू लागले. याचवेळी ऋषी महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या कामेश्वर जगन्नाथ वाघमारे या 14 वर्षीय मुलाने मागचा पुढचा विचार न करता नदीमध्ये उडी घेतली. कामेश्वर याने आदित्य दुडे आणि गजानन श्रीमंगले या दोघांना वाचवले. मात्र ओम मठपती हा कामेश्वर याच्या हाती न लागल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

























































