संगणकावरील पुस्तके ब्रेल लिपीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
braille alphabet

राज्य लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अंध विद्यार्थी भाग घेतात. या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱया प्रा. हेमंत देव आणि प्रा. गौरी कापुरे यांची पुस्तके द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन (इंडिया)तर्फे ब्रेल लिपीत छापली आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या सीएसआर उपक्रमाअंतर्गत ही पुस्तके ब्रेल लिपीत छापण्यात आली आहेत. हिंदुस्थानात अशा प्रकारची ही पहिलीच ब्रेल लिपीतील पुस्तके आहेत.

या पुस्तकाच्या माध्यमातून संगणकाची भूमिका, हार्डवेअर ओळख, संगणक वापर, डेटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग, इंटरनेट माहिती, नेटवर्क, मोबाईल कम्युनिकेशन, सायबर गुन्हे आणि त्यांचे प्रतिबंध याबाबतची माहिती या पुस्तकात मिळणार आहे. या पुस्तकाची किंमत 3000 रुपये इतकी असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी संस्थेच्या www.bwoindia.org भेट देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.