
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘झी टीव्ही’ तसेच ‘अॅण्ड टीव्ही’ या वाहिन्यांनी आपल्या भाभीजी घर पर है, तुझसे है राबता या मालिकांमधून निवडणूक आचारसंहिता भंग होणारी दृश्ये दाखविली आहेत. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा दाखल करून या वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करा अशी मागणी काँग्रेसकडून आज निवडणूक आयोगाला करण्यात आली. याविषयीची तक्रारही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे.
‘झी टीव्ही’ तसेच ‘अॅण्ड टीव्ही’मधील मालिकांचा वापर पेड न्यूजसारखा करण्यात येत आहे. मागील आठवडाभर हा प्रकार सुरू आहे. मालिकांच्या लोकप्रियतेचा उपयोग करून भाजपकडून प्रचार सुरू असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. ही कार्यपद्धती समजून घेण्याकरिता झी टीव्हीवरील ‘तुझसे हे राबता’ व अॅण्ड टीव्हीवरील ‘भाभीजी घर पर है’ या मालिकांमधील दृश्य पेन ड्राइव्हच्या माध्यमातून पुरावे म्हणून आम्ही राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे सोपवले आहेत असे सावंत म्हणाले.
—


























































