
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाही कोरोना झाला आहे. प्रियांका गांधी यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. सर्व प्रोटोकॉल पाळत मी स्वत:ला घरी क्वारंटाईन केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, अशी विनंती करत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका गांधी या लखनौ येथे काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिरात सहभागी झाल्या होत्या. लखनौ येथून दिल्लीला आल्यानंतर प्रियांका गांधी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.


























































