भाजपाविरोधात मजबूत ताकद उभारू, काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवातून काँग्रेसने धडा घेतला असून 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कामाला लागा असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. तसेच भाजपाविरोधात मजबूत ताकद उभारण्याचा निर्धारही केला.  काँग्रेस कार्यकारणीची बैठक नवी दिल्लीत पार पडली. त्यावेळी खरगे बोलत होते.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढावी

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी दुसऱ्या टप्प्यात भारत जोडो यात्रा काढावी असा सल्लाही त्यांनी दिला.

28 डिसेंबरला नागपुरमध्ये विशाल मोर्चा

काँग्रेसच्या 138 व्या स्थापना दिवसानिमित्त येत्या 28 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये विशाल मोर्चा काढण्यात येईल असेही खरगे म्हणाले. हा मोर्चा ऐतिहासिक असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.