अर्णबला अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा! काँग्रेसचा निषेध मोर्चा

रिपब्लिक टीव्हीचा संपादक अर्णब गोस्वामी हा केंद्रातील भाजप सरकारचा दलाल आहे. त्याच्यावर कडक कारवाई करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. अर्णब गोस्वामीला अटक करा, या मागणीसाठी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली  मुंबईतील वरळी येथील जांबोरी मैदान ते रिपब्लिक टीव्हीच्या कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली गोपनीय माहिती फोडणाऱया अर्णब गोस्वामीविरोधात राष्ट्रवादीने गुरुवारी आंदोलन केले. त्यापाठोपाठ आज काँग्रेसकडूनही आंदोलन करीत अर्णबच्या अटकेची मागणी करण्यात आली. अर्णब गोस्वामी याने या गोपनीय माहितीचा उपयोग टीआरपी वाढविण्यासाठी केला.

देशाची सुरक्षा त्याने धोक्यात आणली होती, हा देशद्रोहच आहे, असे सांगत काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी अर्णबच्या अटकेची जोरदार मागणी या आंदोलनादरम्यान केली. या मोर्चामध्ये काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

आपली प्रतिक्रिया द्या