गोव्यात सत्तास्थापनेचा काँग्रेसचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पणजी

भाजप नेते मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सरकार असलेल्या गोव्यात काँग्रेसने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शनिवारी सरकार बनवण्याचा दावा राज्यपालांकडे केला. विधानसभेच्या 40 जागा असलेल्या गोव्यात 16 जागा जिंकलेला काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे.

गोव्यातील भाजपचे अल्पमताचे सरकार बरखास्त करण्यात यावे आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी, अशी मागणी काँग्रेसने राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे पत्र सादर करून केली आहे. गोव्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न झाल्यास तो बेकायदा ठरेल. त्या विरोधात आव्हान दिले जाईल, असा इशाराही काँग्रेसने  दिला आहे.

गोव्यात 4 फेब्रुवारी 2017 रोजी विधानसभेची निवडणूक झाली होती. त्यात काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 16 जागा जिंकल्या. तर भाजपला 14 जागांवर विजय मिळाला होता. मात्र भाजपने महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी (3), गोवा फॉरवर्ड ब्लॉक (2) आणि 2 अपक्षांचा पाठिंबा मिळवून तिथे सरकार स्थापन केले.