
मंत्रालयात प्रवेशद्वारावर व्हिजीटर्सना प्रवेश पास देणाऱया पंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या या कर्मचाऱयांनी आज सकाळी अचानक काम बंद आंदोलन पुकारले. त्यामुळे कुणालाही मंत्रालयात प्रवेश मिळत नव्हता.
या आंदोलनामुळे प्रशासनाची विशेषतः पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. गृह विभागाच्या अधिकाऱयांनी तातडीने यात हस्तक्षेप करून या कर्मचाऱयांशी चर्चा केली आणि त्यांना वेतन दिले जाईल, असे आश्वासन दिले. अधिकाऱयांनी दिलेल्या या आश्वासनानंतर या कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन मागे घेतले आणि त्यानंतर दोन तासांनंतर पास वितरित करण्याची यंत्रणा सुरळीत सुरू झाली.
मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे
या आंदोलनावर प्रतिक्रीया व्यक्त करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मंत्रालयातील कर्मचाऱयांनी संप पुकारला ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱयांना त्यांची देणी तातडीने द्यावीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून या कामगारांना न्याय द्यावा, अशीही सुप्रिया सुळे यांनी केली.





























































