‘सम: समं शमयन्ति’ तत्त्व गुणकारी, होमिओपॅथीमुळे गंभीर रुग्णांची कोरोनावर मात

पिंपळगाव-बसवंत येथील होमिओपॅथी तज्ञ डॉ. पंकजकुमार कोकाटे यांनी ‘समः समं शमयन्ति’ या तत्त्वानुसार गेल्या काही महिन्यात उपचार केलेले सर्वच्या सर्व कोरोनाबाधित व त्यांच्या संपर्कातील व्यक्ती असे चारशेहून अधिक जण ठणठणीत बरे झाले आहेत. व्हेंटिलेटरवरील गंभीर रुग्णांनीही कोरोनावर मात केली आहे. आजाराची लक्षणे ओळखून ते दोष दूर करण्यासाठी शरीरात शॉर्ट इम्युनिटी तयार करण्याची ही पद्धतच अधिक गुणकारी आहे. त्याच्या जोडीला प्राचीन दिनचर्येचा अवलंब करणे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. पंकजकुमार द्वारकानाथ कोकाटे हे गेल्या वीस वर्षांपासून पिंपळगाव बसवंत येथे रुग्णसेवा करीत आहेत. त्यांनी कॅन्सर आणि सिरोसिससारख्या अनेक गंभीर आजारांनी त्रस्त रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यात त्यांनी कोरोनाबाधित आणि हायरिस्क कॉन्टॅक्टमधील व्यक्ती अशा चारशे जणांवर यशस्वी उपचार केले. व्हेंटिलेटरवरील तीन-चार गंभीर रुग्णही बरे झाले. याचे संपूर्ण यश ‘समः समं शमयन्ति’ या तत्त्वात दडले आहे. जशास तसे याप्रमाणे शरीरात निर्माण झालेल्या नैसर्गिक आजाराची सर्व लक्षणे ओळखून त्वरित शॉर्ट इम्युनिटी तयार होईल अशा पद्धतीने औषधे दिले जातात,असे त्यांनी सांगितले.

 चीनमध्ये कोविडचा संसर्ग वाढत असतानाच्या सुरुवातीच्या काळातच डॉ. कोकाटे यांनी आपल्या डॉक्टरांच्याग्रुपवर संबंधित रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱया औषधांविषयी सूचवले होते. त्यातीलच काही औषधे पुढे आयुष मंत्रालयाने जाहीर केली. डॉ. कोकाटे हे आजाराची लक्षणे लक्षात घेऊन दहा ते अकरा औषधांचा उपयोग करून या रुग्णांवर उपचार करीत आहेत. कोरोनासारखी लक्षणे आणि त्यावरील उपचार यांचा उल्लेख आपल्याकडील प्राचीनग्रंथांमध्ये आढळतो, असे ते म्हणाले.

प्राचीन दिनचर्येकडे वळा

प्राचीन भारतीय संस्कृतीत चांगल्या आरोग्याचे रहस्य दडले आहे. ऋषीमुनींप्रमाणे दिनचर्या हवी. प्राणायाम, योग, मन आणि शरीर सक्षम करणारा आहार याकडे लक्ष द्यावे.

डॉक्टरांमध्ये तात्विक संवाद हवा

सर्व पॅथीच्या डॉक्टरांमध्ये समन्वय आणि तात्वीक संवाद गरजेचा आहे,तरच समाजाचे आरोग्य चांगले राखणे शक्य होईल. केंद्र सरकारने होमिओपॅथी आणि आयुर्वेद तज्ञांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी व्यासपीठ दिले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

खर्च पाच हजारांहून कमी

त्यांनी गेल्या काही महिन्यात अनेक कोविडबाधितांवर उपचार केले, त्यापैकी काही व्हेंटिलेटरवर होते. मात्र,त्या सर्वांवरील उपचारांचा औषधांसह खर्च पाच हजारांच्या पुढे गेला नाही, हे महत्त्वाचे आहे. हालाखीची परिस्थिती असलेल्या एका रुग्णासह त्याच्या सोळा नातेवाईकांवर प्रसंगी मोफत उपचार केले,तेही ठणठणीत आहेत, असे कोकाटे यांनी सांगितले.

कॅन्सरग्रस्तांनाही संजिवनी

डॉ. कोकाटे यांनी सन 2009 मध्ये ब्रेनटयूमर शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या रुग्णावर उपचार केले. अवघ्या एक-दीड महिन्यात त्याची गाठ दूर होऊन प्रकृती सुधारली. हे वैद्यक क्षेत्रालाही चकीत करणारे ठरले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या