
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी साईबाबा मंदिर आज दुपारी 3 पासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर संस्थांनचे प्रसादालयही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंदिर परिसरात भक्तांना प्रवेश बंद करन्यात येणार आहे. मात्र मंदिरात आरती व सर्व धार्मीक विधी नियमीत सुरू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिर्डी साईबाबा विश्वस्त समीतीने हा निर्णय घेतला असून कार्यकारी अधिकारी डोंगरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली. 3 वाजता मंदिर दरवाजे बंद करणार असून भक्त निवासही बंद ठेवणार आहेत.




























































