कोरोना रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा क्रमांक घसरला; केंद्रीय आरोग्य सचिवांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रात मागील दोन आठवड्यांत दररोज आढळणाऱया कोरोना रुग्ण संख्येत घसरण झाली असून आठ राज्याच्या तक्त्यात आता राज्य सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. दिल्ली येथे दररोजच्या रुग्ण संख्येत 100 टक्के वाढ आहे, हरियाना 53 टक्के, पश्चिम बंगाल 8 टक्के वाढ आहे. या तुलनेत गुजरातमध्ये 14 टक्के घट, केरळ 28 टक्के, छतीसगड 50 टक्के, महाराष्ट्र 76 टक्के अशी रुग्ण संख्या कमी झाली आहे. मात्र मृत्यू दर अजूनही महाराष्ट्रात सर्वात जास्त 2.44, पश्चिम बंगाल 1.75  दिल्लीत 1.22, छतीसगढ 1.15 असा आहे असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

कोरोना स्थितीचा आढवा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह पश्चिम बंगाल, गुजरात, हरियाणा, केरळ, छत्तीसगड आणि दिल्लीचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन उपस्थित होते. त्यावेळी आरोग्य सचिवांनी देशातील कोरोना स्थितीचे सादरीकरण केले.

पंतप्रधान काय म्हणाले?

 कोरोनाकाळातील लॉकडाऊनच्या वेगवेगळ्या टप्प्यात लोकांचा व्यवहार वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळाला. पहिल्या टप्प्यात लोक घाबरले होते. दुसऱया टप्प्यात संभ्रमात होते. तिसऱया टप्प्यापासून लोक हा संसर्ग समजू लागले. चौथ्या टप्प्यात रिकव्हरी रेट वाढला आणि बेफिकीरपणा वाढू लागला.

कोरोनावरील लस कधी येणार? हे आम्ही ठरवू शकत नाहीत. याबाबत मीही सांगू शकत नाही. याविषयी वैज्ञानिकच सांगतील. हे वैज्ञानिकांच्या हातात आहे.

कोरोना लसीची किंमत काय असेल? लसीचे एक डोस द्यायचे की दोन? हेही अद्याप निश्चित झालेले नाही.

…आणि मुख्यमंत्री खट्टर यांना रोखले

यावेळी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे हरियाणात कोरोना रुग्णांची संख्या रोज सरासरी दोन हजाराने वाढत आहे, असे सांगत होते तेवढय़ात पंतप्रधान मोदी यांनी त्यांना मध्येच रोखले. हे आकडे आमच्याकडे पूर्वीच आलेले आहेत. तुम्ही कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याबाबत काय योजना केल्या? त्याबाबत सांगा, असे पंतप्रधानांनी विचारले.

 

 मोदी शनिवारी ‘सीरम’ला भेट देणार; 98 देशांचे राजदूत 4 डिसेंबरला पुण्यात येणार

कोरोनावरील लस तयार करणाऱया पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट व जीनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स कंपनीकडे जगाचे चातकासारखे लक्ष लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवार, 28 नोव्हेंबर रोजी पुण्यात सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देण्यासाठी येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरातील तब्बल 98 देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी एक दिवसाच्या पुणे दौऱयावर येत असून, ते या दोन्ही संस्थांना भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणेभेटीचा प्राथमिक कार्यक्रम राजशिष्टाचार विभागाकडे आला असून, रात्री तो अंतिम होईल. पंतप्रधान शनिवारी पुण्यातील कोरोना लस तयार करणाऱया सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देणार आहेत.

देशव्यापी धोरण असेल तर नियोजनबद्ध लढा देता येईल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्लीत, केरळमध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी पुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी 24 हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता 4700 ते 5000 रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पेंद्राकडून दिल्या जाणाऱया सूचना कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करीत आहे. राज्यात दोन टप्प्यांत राबविण्यात आलेल्या ‘माझे पुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे असे मुख्यमंत्री म्हणाले. या मोहिमेत प्रत्येक घरात आरोग्य चौकशी करण्यात आली असून 11 कोटी 92 लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत 3.5 लाख सारी आणि आयएलआयचे रुग्णही सापडले तसेच 51 हजार कोरोना रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.

सावधपणे पावले टाकत आहोत

कोविडमधून बऱया झालेल्या काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्यादेखील आढळत असून यावरही आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज राज्यात दररोज 70 ते 80 हजार चाचण्या होत असून आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविण्याचे तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीत जास्त संपर्प शोधण्यास सांगण्यात आले आहे. कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अतिशय सावधपणे पावले टाकत आहोत.