#Coronavirus लॉकडाऊनमध्ये ‘या’ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार

1163

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून आतापर्यंत 11हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्थानात या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असून त्याला रोखण्यासाठी देशभरातील सर्व राज्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. 31 मार्चपर्यंत देशातील रेल्वेसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. सर्व खासगी कार्यालये दुकाने बंद करण्यात आली असून लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. असे असताना फक्त देशभरात अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत.

लॉकडाऊन काळात अन्नधान्याचा दुधाचा साठा कमी पडेल म्हणून नागरिकांनी दुकानांबाहेर गर्दी केली होती. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत जीवनावश्यक वस्तूंचा साठा करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले आहे. लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊन काळात सुरू राहणाऱ्या अत्यावश्यक सेवा
– हॉस्पिटल व मेडिकल दुकाने
– बँका व एटीएम
– अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांच्या ने आणसाठी सार्वजनिक वाहने
– अन्नधान्याची, भाजी व फळांची दुकाने
– दुधाचा पुरवठा
– स्वयंपाकाचा गॅस पुरवठा
– टेलिकॉम सर्व्हिस
– प्रसारमाध्यमांची कार्यालय

– पेट्रोलियम

– वीज

आपली प्रतिक्रिया द्या