Corona Virus ची लागण झाल्याचा संशय असलेले 5 रुग्ण पळाले, नागपुरात शोधाशोध सुरू

728

नागपूरमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. Corona Virus ची लागण झाल्याचा संशय असलेले 5 रुग्ण पळून गेले आहेत. रुग्ण पळाल्यानंतर शहरात अलर्ट जारी करण्यात आला असून या रुग्णांचा युद्धपातळीवर शोध घेण्यात येत आहे. या संशयित रुग्णांना नागपुरातील मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या सगळ्यांना आजाराची लागण झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते.

पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनी हे संशयित रुग्ण पळून गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबतचे वृत्त नवभारत टाईम्स या वर्तमानपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी हे रुग्ण शोधण्यासाठी अलर्ट जारी केला असून त्यांना ताब्यात घेण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. नागपूरमध्ये 3 रुग्णांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे निदान झाले आहे. महाराष्ट्रामध्ये एकूण 17 जणांना या आजाराची लागण झाली आहे. नागपूरचे विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी 45 वर्षांच्या एका व्यक्तीला या आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याचे सांगितले होते. त्याच्या बायकोला आणि मित्रालाही या आजाराची लागण झाल्याचे निदान झाले आले आहे. हे तिघे जण काही दिवसांपूर्वी अमेरिकेवरून मायदेशात परतले होते. या तिघांवर सध्या मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या