
कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभराचा धोका वाढवला आहे. हा व्हेरिएंट अधिक घातक असून झपाट्याने पसरत आहे. या व्हेरिएंटला रोखण्यासाठी लस हाच एक प्रभावी उपाय आहे. कोरोनाचे संक्रमण झालेल्यांमध्ये अँटीबॉडी तयार होत असल्याने त्यांनी लस घ्यावी किंवा नाही, याबाबतचे संशोधन सुरू होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यातून बरे होणाऱ्यांनीही कोरोनाची लस घेणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना लसीमुळे व्हायरसविरोधातील रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते. तसेच लस घेतल्याने डेल्टा व्हेरिएंटचा धोकाही कमी होत आहे. याआधी कोरोनाची लागण झालेल्यांनीही लस घेणे गरजेचे असल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतरही लस न घेतलेल्यांना डेल्टा व्हेरिएंटमुळे पुन्हा कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती असल्याचे संशोधकांनी सांगितले. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासातून याबाबतचे निष्कर्ष काढण्यात आल्याचे संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचा अहवाल शुक्रवारी जारी करण्यात आला. त्यात कोरोनाची लागण झालेल्यांनीही कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांनीही लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन संशोधकांनी केले आहे. डेल्टा व्हेरिएंट झपाट्याने पसरत असून त्याचा धोका वाढला आहे. याआधी कोरोनाची लागण झालेल्यांना या व्हेरिएंटचा जास्त धोका आहे. त्यामुळे त्यांनी लस घेण्याची गरज आहे,असे अहवालात म्हटले आहे.
कोरोना लसीमुळे रोगप्रतिकारकशक्ती नैसर्गिकरित्या वाढत असून त्यामुळे डेल्टा व्हेरिएंटपासूनही संरक्षण मिळत असल्याचे अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता नागरिकांना लस घ्यावी, असेही संशोधकांनी स्पष्ट केले आहे. याआधी कोरोनाची लगण झालेल्यांनी कोरोनाची लस घेणे गरजेचे आहे. लस घेतल्याने या व्हेरिएंटपासून बचाव होण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणार असल्याचे सीडीसीचे संचालक रोशेन वालेंस्की यांनी सांगितले.
अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये कोरोनाची लागण झालेल्यांना पुन्हा संक्रमण झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी कोरोनाची लस घेतली नव्हती, असे आढळून आले आहे. आता देशातही डेल्टा व्हेरिएंटचा धोका वाढत असल्याने याआधी कोरोनाची लागण झालेल्यांनी संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी लस घेणे गरजेचे असल्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे. याआधी कोरोनाची लागण झालेल्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी लस घेणे गरजेचे असल्याचे, साथीच्या रोगाचे तज्ज्ञ डॉ.अँथनी फाऊची यांनी सांगितले. त्यामुळे डेल्टा व्हरिएंटचा धोका कमी होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.





























































