मीसुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण असा खेळ कधी खेळला नाही

विरोधी पक्षनेता म्हणूनही मीसुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्र्यामांजराचा खेळ कधी खेळला नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रविवारी दुपारी पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना खडसे यांनी फडणवीसांवर हे टीकास्त्र्ा सोडले. खडसे म्हणाले, महाराष्ट्रात ज्या ज्या वेळी संकट आले अथवा आकस्मिक संकटाचा प्रसंग उद्भवला; मग तो किल।ारीचा भूकंप असो किंवा मुंबईत झालेले साखळी बॉम्बस्पह्ट असोत, अशा वेळी राजकारण बाजूला ठेवून विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाने हातात हात घालून काम केले आहे. विरोधी पक्षनेता म्हणूनही मीसुद्धा काम केले आहे. पण, संकटाच्या काळात असा कुत्रा-मांजराचा खेळ कधी खेळला नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत, ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही.

फडणवीसांचा ‘तो’ अभ्यास कमी

मला वाटलं फडणवीस उत्तम भविष्यकार असतील. त्यांनी आतापर्यंत चार ते पाचवेळा सरकार पडणार म्हणून सांगितले. आता त्यांनी पुन्हा दोन तारीख दिली आहे. मी दोन तारखेची वाट पाहतो आहे. जर दोन तारखेला सरकार पडले नाही, तर त्यांचा भविष्यकार म्हणून अभ्यास कमी आहे असे मी समजेन, असेही खडसे म्हणाले.

केंद्राने राजकारण बाजूला ठेवावे

केंद्र सरकारने वेळीच रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यातबंदी केली असती तर आपल्याला मोठय़ा प्रमाणावर साठा उपलब्ध झाला असता. केंद्राने वेळीच निर्यातबंदी का केली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने करोनाच्या या कठीण काळात राजकारण बाजूला ठेवून मदत करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या