नाशिक – जिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’च्या तीन संशयितांवर उपचार सुरू

परदेशातून आलेल्या ‘कोरोना’ संशयित तीन रुग्णांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात परदेशातून आलेल्या इतर 23 जणांची नियमित वैद्यकीय तपासणी सुरू असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निखील सैंदाणे यांनी दिली. इटली व इराण येथून आलेल्या प्रत्येकी एका रुग्णाला याआधी नाशिक जिल्हा रुग्णालयातील विशेष कक्षात दाखल करण्यात आले होते, त्यांच्या घशातील स्त्रावांची तपासणी निगेटिव्ह आली. त्यानंतर बुधवारी अमेरिकेतून आलेल्या एकाला कोरोना संशयित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने बुधवारीच पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन केंद्रात पाठविण्यात आले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत अहवाल आलेला नाही. दुबई व इराण येथून नाशिकला आलेल्या प्रत्येकी एका संशयित रुग्णालाही गुरुवारी सायंकाळी दाखल करण्यात आले. त्यामुळे येथे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या तीनवर पोहचली आहे. फेब्रुवारीपासून आजपर्यंत इराण, इटली, ऑस्ट्रेलि या, यूएस व दुबई येथून नाशिक जिल्ह्यात आलेल्या २३जणांची नियमित तपासणी सुरू असून, त्यात महापालिका हद्दीतील 18 जणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाने दिली.

आपली प्रतिक्रिया द्या