आयआयटी कॅम्पसमध्ये गोशाळा

30

सामना प्रतिनिधी । मुंबई

आयआयटी मुंबईच्या पवई येथील कॅम्पसमध्ये गोशाळा उभारण्यात येणार आहे. दोन दिकसांपूर्की एका मोकाट बैलाने आयआयटीच्या विद्यार्थ्यांला धडक देऊन जखमी केले. या दुर्घटनेची आयआयटी प्रशासनाने गंभीर देखल घेत कॅम्पस परिसरात मोकाट गाईबैलांसाठी गोशाळा उभारण्याचा विचार सुरू केला आहे.

आयआयटीकडून कॅम्पसमध्ये जागेचा शोध सुरू असून गोशाळेसाठी जागा निवडताना शैक्षणिक कार्यक्रम आणि स्थानिक रहिवाशांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. मोकाट गायी-बैलांचा या ठिकाणी नेहमी काकर असतो, त्यामुळे त्यांची देखभाल करण्यासाठी निकारा उभारण्याचा विचार आहे, पण त्याला गोशाळा म्हणता येणार नाही हे शेल्टर असू शकते अशी प्रतिक्रिया आयआयटी मुंबईच्या विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता टी. कुंदू यांनी दिली.

मोकाट बैलांना पकडण्यासाठी मुंबई महापालिकेचे कर्मचारी आयआयटीत पोहोचले असता प्राणिमित्र आणि काही विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. दोनपैकी एका बैलाला या जमाकाने पळकून लाकले; परंतु एका बैलाला पकडण्यात पालिकेच्या कर्मचाऱयांना यश आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या