न्यूझीलंड दौऱ्यामधून खूप काही शिकलो

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाने गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये चांगली कामगिरी केलीय; पण न्यूझीलंड दौऱयामध्ये पराभवाचा सामना करावा लागला. जय-पराजय हा खेळाचाच भाग आहे. न्यूझीलंड दौऱयामधून खूप काही शिकलो. फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही प्रकारात मोलाचे धडे मिळाले. आपले ध्येय गाठण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही. नेहमी आशावादी राहायचे. आता याचा फायदा ऑस्ट्रेलियन दौऱयात होईल, असा विश्वासही अजिंक्य रहाणे याने यावेळी व्यक्त केला.

शॉर्ट बॉल्सची चिंता नाही

शॉर्ट चेंडूवर हिंदुस्थानच्या फलंदाजांना न्यूझीलंड दौऱयात अपयशाचा सामना करावा लागला. अजिंक्य रहाणेला याबाबत विचारले असता तो म्हणाला, एखाद्या डावातील खेळीवरून समज करून घेणे चुकीचे आहे. मेलबर्न येथील सामन्यातही शॉर्ट चेंडूंचा मारा होत होता. त्यावेळी धावा करण्यात यश लाभले होते. त्यामुळे शॉर्ट चेंडूंना कसे सामोरे जायचे याबाबत चिंता नाही, असे अजिंक्य रहाणे विश्वासाने सांगतो.

  • अजिंक्य रहाणे याने शेती व शेतकऱयांच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. त्याने महिंद्रा कंपनीचे पाठबळ असलेल्या ‘मेरा किसान’मध्ये गुंतवणूक केली असून त्याची ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या