
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये सर्वात वादग्रस्त बांगलादेश आणि दिवसागणिक कामगिरीत प्रगती करत असलेला अफगाणिस्तान या तुल्यबळ संघांमध्ये निसर्गरम्य धर्मशाळेच्या मैदानावर चुरशीची लढत होणार आहे. बांगलादेश आपल्या अंतर्गत वादामुळे अफगाणिस्तानसमोर किती ताकदीने उभा राहतो, हे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे अफगाणिस्तानला फारसे वन डे खेळता आले नसले तरी गेल्या महिन्यात त्यांनी बांगलादेशला झुंजवले होते. अफगाणने आपल्या संघात नवखे खेळाडूच अधिक उतरवले आहेत.
अफगाणिस्तान – हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम झदरान, इकरम अलीखील, नजीबुल्लाह झदरान, रहमानुल्लाह गुरबाझ, रियाझ हसन, अजमतुल्लाह ओमरझाई, मोहम्मद नबी, रहमत शाह, राशीद खान, अब्दुल रहमान, फझलहक फारुकी, मुजीब रहमान, नवीन-उल-हक, नूर अहमद.
बांगलादेश – नजमल हुसेन शांतो, लिटन दास, मुशफिकर रहीम, तंझिद हसन, तौहिद हसन, शाकिब अल हसन (कर्णधार), महेदी हसन, महमुदुल्लाह, महीदी हसन मिराझ, हसन महमूद, मुस्तफिझूर रहमान, नसुम अहमद, शोरिफुल इस्लाम, तंझिम हसन साकिब, टस्किन अहमद.































































