
युवतीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या रिक्षाचालकाला अखेर जुहू पोलिसांनी अटक केली. शकील खान असे त्याचे नाव असून त्याच्या विरोधात जुहू पोलिसांनी दोषारोपपत्रदेखील सादर केले.
तक्रारदार युवती दोन दिवसांपूर्वी महाविद्यालयात जात होती. कॉलेजच्या गेटवर उतरल्यावर पैसे देत असताना शकीलने अश्लील भाषा वापरली. त्यानंतर शकील तेथून निघून गेला. तेव्हा तरुणीने त्या रिक्षाचा नंबर लिहून घेतला. याप्रकरणी तरुणीने जुहू पोलीस ठाण्यात धाव घेतली. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.



























































