शहरातील विविध भागातून दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईताला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून वाहन चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आले असून 3 लाखांची वाहने जप्त करण्यात आली. आशिष श्रीनाथ गायकवाड (वय 19 रा. आनंदनगर, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
हडपसर पोलीस हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना सराईत वाहनचोर रामटेकडी परिसरात थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ आणि सुरज कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आशिष गायकवाड याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार आशिष साबळे (रा. मांजरी ) याच्या मदतीने हडपसर, वानवडी आणि शिवाजीनगर परिसरातून वाहनचोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक विश्वास डगळे, एपीआय विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, अंकुश बनसुडे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे यांनी केली.
सराईत वाहनचोराची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारासह विविध भागातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर

























































