
ओडीशामध्ये एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भातात मुंगी सापडल्याने नवरा बायकोत झालेल्या भांडणात संतापले्या बायकोने नवऱ्याचा गळा दाबून हत्या केल्याची संतापजनक घटना ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
याप्रकरणी सासरे शशी भूषण बाघ यांनी सूनेविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. सरीता बाघ असे आरोपी महिलेचे नाव आहे. हेमंत बाघ (35) हा टॅक्सी चालक म्हणून काम करायचा. तो बायको सरीता, मुलगी हेमलता(7) आणि मुलगा सौम्य (4) असे त्यांचे कुटुंब आहे. सासऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत, हेमंत घरी आल्यावर सरीताने त्याला जेवायला वाढले. जेवायला बसल्यावर त्याला भातात मुंगी दिसली. त्यावरुन तो सरीतावर वैतागला. त्यामुळे दोघांमध्ये भांडण झालं. भांडण इतकं वाढलं की सरीताचा पारा सुटला आणि तिने स्कार्पच्या मदतीने हेमंतचा गळा आवळून जीव घेतला. याप्रकरणी पोलिसांनी सरीताला ताब्यात घेतले आहे.




























































