शिर्डी – शेतात पाणी भरणाऱ्या शेतकऱ्याचा खुन .

431
crime-spot

रांजणगाव देशमुख येथील शेतकरी संजय खालकर यांचा रविवारी मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी शेतात पाणी भरत असतांना खुन केल्याची घटना घडली आहे. संजय बाळासाहेब खालकर हे रांजणगाव देशमुख येथे राहतात त्यांची कोपरगाव-संगमनेर मार्गालगत शेती आहे. दिवसभर विद्युत पुरवठा नसल्याने ते रात्री शेतात पाणी भरत असतांना रविवारी मध्यरात्री पावणे बाराच्या दरम्यान ही घटना घडली आहे.

संजय खालकर यांच्या शेतालगतच त्यांचे चुलत भाऊ ज्ञानदेव भाऊसाहेब खालकर यांचे शेत आहे. ते ही आपल्या शेतात पाणी भरत होते. त्यांनी पाणी भरत असतांना रोडकडे बॅटरीचा प्रकाश झोत टाकला असता त्यांना रोडवर तीघे तोंड बांधलेल्या अवस्थेत उभे दिसले. तसेच त्यांच्याजवळ पांढऱ्या रंगाची कारही उभाी दिसली. ज्ञानदेव खालकर यांनी बॅटरीचा झोत टाकल्याने ते तीघे खालकर यांच्या दिशेने धावुन आले. त्यामुळे खालकर आपल्या मोटार सायकलकडे पळाले. त्याचवेळी त्यांना बंधु संजय खालकर हे खाली पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ घरी जाऊन ही घटना चुलत भाऊ व कुटूंबियांना सांगितली. त्यानंतर संजय खालकर यांना तातडीने साईसंस्थानच्या रूग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस खुन्याचा शोध घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या