दादरचा पादचारी पूल काही दिवसांसाठी बंद राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पूल कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला तर 39 जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर आता दादर स्थानकातील सीएसएमटीच्या दिशेकडील पादचारी पूल रेल्वे दुरुस्तीसाठी उद्यापासून बंद करणार आहे. पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी ही माहिती दिली आहे.

शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या पूलाची पाहणी केली. त्यानंतर या पूलाच्या डागडुजीचा निर्णय घेण्यात आला.
पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 व 3 च्या पायऱ्या पुढील तेरा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. तर प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळील पूलाच्या काही भागाची दुरुस्ती करण्यासाठी हा पूल तीन महिने बंद राहणार आहे. त्यामुळे 17 मार्च ते 16 जून पर्यंत पादचाऱ्यांना रेल्वेचा पादचारी पूल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे.