Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 19 फेब्रुवारीचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेष (ARIES – Saturday, February 19, 2022)
मनावर संयम राखा. आवश्यकता असेल तरच प्रवास करा. अनोळखी व्यक्तिवर विश्वास ठेवू नका. घरातील थोरामोठ्यांचे आशीर्वाद घ्या. श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तुमचे प्रयत्न योग्य दिशेने होत आहेत ना याची काळजी घ्या. कार्यक्षेत्रात प्रगती करण्याचा आजचा दिवस आहे.
शुभरंग: पोपटी

वृषभ (TAURUS – Saturday, February 19, 2022)
अडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. कोणालाही आश्वासन देऊ नका. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, हे लक्षात असू द्या. उगाच कोणावर राग काढू नका. लोकांशी मधुरावाणीने बोलून कामे साध्य करून घ्या.
शुभरंग: मोरपिसी

मिथुन (GEMINI – Saturday, February 19, 2022)
कामाशिवाय इतर बाबतीत पडू नका. ध्येय गाठण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या तक्रारीकडे फार लक्ष देऊ नका. कधी कधी इतरांना समजून घेणाऱ्या ह्रदयाची लोकांना गरज असते, हे लक्षात असू द्या. तुमच्या सुख-दु:खाचं बटण लोकांच्या हातात देऊ नका. अडचणीतही यश मिळेल. नीट शिकायचं तर पुन्हा पुन्हा तीच गोष्ट केली पाहिजे.
शुभरंग: काळा

कर्क (CANCER – Saturday, February 19, 2022)
स्वत:चा निर्णय पुन्हा तपासून पाहा. समाजसेवा कराल. तारतम्याने निर्णय घ्यावे लागतील. प्रयत्न करणे आपल्या हाती आहे, हे लक्षात घ्या. समस्येवर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. नकोसे वाटत असतानाही प्रवास करावा लागू शकतो.
शुभरंग: चंदेरी

सिंह (LEO – Saturday, February 19, 2022)
नातेवाईकांकडून फार अपेक्षा ठेवू नका. संधीतूनच तुमची किंमत कळेल. प्रतिष्ठित व्यक्तिचा सहवास लाभेल. इतरांचे ऐकून घेण्याचीही काही वेळा तयारी ठेवावी लागते. वेळेचा सदुपयोग करा. अतिचांगुलपणा दाखवू नका. आर्थिक गुंतवणुकीमुळे भविष्यकाळात मदत होईल.
शुभरंग: जांभळा

कन्या (VIRGO – Saturday, February 19, 2022)
इतरांच्या अडीअडचणीत मदत कराल. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कला आणि कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल. अंगावर आलेली जबाबदारी टाळू नका. आपल्या करारी स्वभावास मुरड घालावी लागेल. जबाबदारी निभावण्याची क्षमता आपल्यात पुरेपूर आहे, याची जाणीव ठेवा.
शुभरंग: सोनेरी

तूळ (LIBRA – Saturday, February 19, 2022)
नवे मित्र बनतील. वाहन-प्रवास जपून करा. लहान मोठे प्रवास करावे लागतील. फाजील आत्मविश्वास बाळगू नका. उगाच व्याप वाढवू नका. वरिष्ठांशी वादविवाद होऊ शकतात. संघर्ष टाळा आणि सावध राहा. पदोपदी कसोटी असली तरी त्यात तुम्हाला यशस्वी व्हायचंय हे लक्षात घ्या.
शुभरंग: खाकी

वृश्चिक ( SCORPIO – Saturday, February 19, 2022)
घरातील वडीलधाऱ्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. नवीन संधी मिळतील. कुटुंबात सुसंवाद साधा. इतरांची अतिचौकशी करायला जाऊ नका. कोणावरही अवलंबून राहणे टाळा. मिळते-जुळते धोरण ठेवा. केलेले दान गुप्त ठेवा. संयम ठेवा.
शुभरंग: राखाडी

धनु (SAGITTARIUS – Saturday, February 19, 2022)
कामानिमित्त प्रवास होईल. पैशाचा काटकसरीने वापर करा. विचार कृतीत आणा. मनाला आवर घाला. विवेकबुद्धी योग्य ठिकाणी खर्च करा. घरातील वस्तू योग्य जागी ठेवा. इतरांशी बोलताना मधुरावाणीचा वापर करा.
शुभरंग: चिंतामणी

मकर ( CAPRICORN – Saturday, February 19, 2022)
पैशाचे व्यवहार मार्गी लागतील. प्रतिकारशक्ती वाढवणे गरजेचे आहे. नियमांचे पालन करा. लोकं काय म्हणतील, याचा विचार केलात की, प्रगतीचा वेग मंदावू शकतो. मनावर ताबा ठेवून हट्टीपणाला मुरड घाला. चुका टाळण्यासाठी आत्मपरीक्षण हा एक पर्याय आहे.
शुभरंग: नारिंगी

कुंभ (AQUARIUS – Saturday, February 19, 2022)
शेजाऱ्यांशी अंतर ठेवून वागा. मोठ्यांचा आदर करा. प्रिय व्यक्तिची भेट होईल. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न कराल. घराचे नूतनीकरण करण्याच्या तयारीला लागाल. आजचा दिवस आपल्यासाठी शुभदायक आहे. आयुष्यात मनाजोगी चांगली घटना होण्याची दाट शक्यता आहे.
शुभरंग: पांढरा

मीन (PISCES – Saturday, February 19, 2022)
प्रकृतीकडे लक्ष द्या. स्वत:चे विचार अमलात आणा. वडीलधाऱ्यांच्या सल्ल्याने वागल्यास लाभ होतील. कोणत्याही गोष्टीवर थेट भाष्य करणे टाळा. मौनव्रत पाळा. लहानसहान गोष्टी मनाला लावून घेऊ नका. स्वीकारलेल्या जबाबदारीवर मनापासून प्रेम करा.
शुभरंग: हिरवा