Daily Horoscope – कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस ? वाचा 5 जानेवारीचे राशीभविष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवार, 5 जानेवारी 2022.

मेष:– संमिश्र दिवस आहे. मन शांत ठेवा. ध्यान धारणा करा. आपली आवडती वस्तू आपल्याला मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ:– जोडीदाराला विश्वासात घ्या. प्रामाणिक भूमिका घ्यावी लागेल. कायद्याचे पालन करावे लागेल. कोणाकडून अपेक्षा ठेवू नका.

मिथुन:– धनप्राप्तीचे योग आहेत. महत्वाची कामे आज पूर्ण करा. फायद्याचे करार होतील. उत्साह टिकून राहिल.

कर्क:– कामात अडथळे येण्याची शक्यता आहे. प्रतिकूल दिवस असला तरी निराश होऊ नका. योग्य वेळी कामे पूर्ण होतील.

सिंह:– वादविवाद टाळा. संयम बाळगा. वास्तू संबंधित कामे मार्गी लागतील. आवडत असलेले रोपटे अंगणात वाढवा. त्याची निगा राखा.

कन्या:– ऐश्वर्य लाभेल. सुखाची अनुभूती लाभेल. आर्थिक आवक चांगली होईल. कुटुंबात सौख्य नांदेल.

तुळ:– खर्चात टाकणारा दिवस आहे. कमी बोलणं हिताचे आहे. विनाकारण कोणाला शब्द देऊ नका. आहारात पोषण तत्त्वांचा समावेश करा.

वृश्चिक:– विचारपूर्वक निर्णय घ्या. सावधपणे पाऊल टाका. अतिआत्मविश्वास नको. नम्रता आणि मधुरावाणीचा आत्मसात करा

धनु:– आज नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ करणारा दिवस आहे. साधना मनापासून केली की, आध्यत्मिक उन्नती होईल.

मकर:– लाभाचा दिवस आहे. येणी वसूल होतील. कर्जे घेणे टाळा. धार्मिक कार्याला दान करा. शक्य तिथे अन्नदान करा.

कुंभ:– संमिश्र पण सुखाचा दिवस आहे. मेहनतीचे फळ मिळेल. यामुळे आनंद होईल. गुरूचा लाभ होईल.

मीन:– धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. आत्मचिंतन करा. इतरांच्या वादात पडू नका. आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे.