सोनिया परचुरे यांचा ‘नॉस्टाल्जिया’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर माटुंगा सांस्कृतिक पेंद्रातर्फे 2 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता ‘नॉस्टाल्जिया’ हा नृत्यदिग्दर्शिका सोनिया परचुरे यांनी दिग्दर्शित केलेला नृत्याविष्कार शरयू नृत्यकलामंदिरचे कलाकार सादर करणार आहेत. हिंदी आणि मराठी सिने संगीतावर आधारित असलेली ही नृत्य प्रस्तुती सोनिया परचुरे यांच्या नृत्यदिग्दर्शनामुळे प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे.  उत्तम आणि दर्जेदार संगीताची आणि नृत्यदिग्दर्शनाची सुंदर सफर घडवणारा हा कार्यक्रम आहे.

हा कार्यक्रम पेंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात होईल. यात कृष्णधवल काळापासून ते अगदी श्रीदेवीच्या काळापर्यंतची दर्जेदार गाणी तितक्याच दर्जेदार पद्धतीने सादर केलेली या कार्यक्रमात पहायला मिळतील. सर्व रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून त्यांनी आनंद घ्यावा, असे आवाहन पेंद्राच्या वतीने करण्यात आले आहे.