दापोली मंडणगडमध्ये अवैध लाकुडतोड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली मंडणगडमध्ये बेसुमार झाडांची कत्तल होत आहे. इतकी कत्तल होत असताना वन विभागाकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्यामुळे वन विभागाच्या एकूणच भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.

दापोली तसेच मंडणगड या दोन तालुक्यात ठिकठिकाणी बेसुमार लाकुड तोड होत असूनही होणारी लाकुडतोड नेमकी कोणाच्या आशिर्वादाने होत आहे आणि म्हणूनच अशा लाकुडतोडीवर वनविभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होत आहे. तरी वन विभाग मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. दापोली वन परिक्षेत्र कार्यक्षेत्राच्या अखत्यारीत येणाऱ्या दोन्ही तालुक्यात विशेषत: सुट्टयांच्या दिवशी तर अगदी हमरस्त्याच्या कडेलाच तोडलेल्या लाकडांचा रचून ठेवलेला ढिग पाहायला मिळतो. रस्त्याच्या कडेला रचून ठेवलेला तोडलेल्या लाकडांचा ढीग पाहिल्यावर तो वन विभागाच्या पूर्व परवानगीने ठेवलेला असावा, असं वाटलं तरी तसं अजिबात नसल्याचं पाहायला मिळत आहे.

दापोली मंडणगड तालूक्यातील गावागावात राजरोसपणे वन विभागाचा धाक नसलेले लाकुड माफिया हे लाकूडतोड अवैधरित्या करत असून अशा या लाकुड तोडीमुळे येेथील पर्यावरणाचे संतुल बिघडत चालले आहे. या एकूणच परिस्थितीचे ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.