कर्जवसुलीसाठी केली तरुणाची बदनामी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कर्जवसुलीसाठी तरुणाची सोशल मीडियावर बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार तरुण हा जोगेश्वरी येथे राहतो. त्याला पैशाची गरज असल्याने त्याने एका लोन ऍपद्वारे कर्जासाठी अर्ज केला होता. अर्ज केल्यावर त्याने त्याच्या बँक खात्याची माहिती त्या ऍपमध्ये अपलोड केली होती. त्यानंतर तक्रारदार याला 74 हजार रुपयाचे कर्ज मंजूर झाले होते. कर्जाची रक्कम त्याच्या खात्यात जमा झाली होती. अल्प मुदतीचे कर्ज असल्याने ते तत्काळ फेडण्यासाठी सांगण्यात आले होते. कर्जवसुलीसाठी तक्रारदारांना विविध नंबरवरून फोन येत होते. जर कर्ज फेडले नाही तर सोशल मीडियावर फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली गेली. बदनामी होऊ नये म्हणून तक्रारदाराने 74 हजार 500 रुपये खात्यात भरले. पैसे भरल्यानंतरही त्यांना रिकव्हरी एजंट हे फोन करून शिवीगाळ करत होते.