दुबईतील शेखला कॉलेजच्या मुली पुरवायचा बाबा चैतन्यानंद, व्हॉट्सअप चॅटमधून खळबळजनक खुलासा

दिल्लीत काळे धंदे करणारा स्वयंघोषित बाबा स्वामी चैतन्यानंद सरस्वती ऊर्फ पार्थसारथी याच्याबाबत रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. 17 तरुणींच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेला हा बाबा पोलीस चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देत असला तरी मोबाईलमधील व्हॉट्सअप चॅटमधून त्याचा नराधम चेहराच समोर आला आहे. हा बाबा आश्रमातील विद्यार्थिनींना आणि महिला अनुयायांचा लैंगिक छळच करत नव्हता, तर दुबईतील शेखलाही पुरवत होता.

वसंत पुंज येथील आश्रमातील अवैध प्रकार काही विद्यार्थिनींनी उघडकीस आणले होते. त्यांनी 62 वर्षीय स्वामी चैतन्यानंद सरस्वती बाबावर विद्यार्थिनींशी गैरवर्तन आणि छेडछाडीचा आरोप केला होता. गुन्हा दाखल झाल्यावर स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार झाला होता. तसेच त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी त्याने न्यायालयात अर्जदेखील दाखल केला होता, मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआऊट नोटीसदेखील जारी केली होती. त्यानंतर रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आग्रा येथील एका हॉटेलमधून चैतन्यानंद सरस्वतीला पोलिसांनी अटक केली.

बाबा चैतन्यानंद याचे व्हॉट्सअप चॅट समोर आले आहेत. दुबईतील एका शेखला शय्यासोबत करण्यासाठी पार्टनर हवा असल्याचे आणि तुझी एखादी मैत्रिण आहे का? असा मेसेज करतो. हे व्हॉट्सअप चॅट समोर आल्यानंतर पोलीसही सुन्न झाले आहेत. यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, आश्रमाच्या आडून हा बाबा मुली पुरवायचा आणि त्याचे रॅकेट आखाती देशांमध्येही पसरलेले आहे.

पोलीस चौकशीमध्ये बाबा चैतन्यानंद याच्या मोबाईलमधून धक्कादायक चॅटिंग समोर आले आहे. हा बाबा मुलींसोबत व्हॉट्सअप चॅट करायचा. बेबी.. बेबी… म्हणत त्यांच्याभौवती पिंगा घायालचा. काही मुलींना तो डॉटर डॉल, स्वीटी असेही शब्दांना हाक मारायचा. सतत मेसेज पाठवून तो मुलींना त्रास द्यायचा आणि आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करायचा, असेही समोर आले आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.