केजरीवाल म्हणतात… दुसरी लाट येऊन गेली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजधानी दिल्लीत कोरोनाची दुसरी लाट येऊन गेल्याचा दावा केला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला दिल्लीत दिवसाला चार हजार रुग्ण आढळत होते. दिल्लीत आलेली ही करोनाची दुसरी लाट होती असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. पहिल्यांदाच एखाद्या राज्याने करोनाच्या दुसऱया लाटेचा सामना केल्याचा दावा केला आहे.

सिसोदियांची प्रकृती ढासळली

दिल्लीचे कोरोनाग्रस्त उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना डेंग्यूची लागण झाली आहे. त्यांच्या रक्तातील प्लेटलेट्स झपाटय़ाने कमी होत असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. सिसोदिया यांच्यावर जयप्रकाश नारायण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना मॅक्स या खासगी रुग्णालयात हलविण्यात येईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या