
सामना प्रतिनिधी। नवी दिल्ली
लोकसभा निवडणूकीत देशाची नजर सर्वाधिक दुष्काळ भोगलेल्या उत्तर प्रदेशाकडे आहे. हाच मुद्दा या ठिकाणी भाजपाने 80 जागांपैकी 71 जागा जिंकून विक्रम घडवला. तर सपाने 5 जागांवर विजय मिळवला. काँग्रेसला केवळ 2 जागा तर अपना दलला 2 जागा जिंकता आल्या. बसपाला खातेही उघडता आले नाही. परंतु या वेळी विरोधकांनी जोरदार तयारी केली असून भाजपाला सत्तेवरून खेचण्यासाठी डावपेच आखायला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशची धुरा प्रियंका गांधींच्या हाती सोपवल्यापासून काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. परंतु काँग्रेस आणि प्रियंका गांधींसाठी हे एक मोठे आव्हान असणार आहे. काँग्रेसचा हा पारंपरिक मतदारसंघ असून कधीकाळी काँग्रेसचेच येथे राज्य होते. जौनपूरचीही गोष्ट वेगळी नव्हती. परंतु आता दुष्काळासारखा कळीचा मुद्दा भाजप आणि काँग्रेससमोर आहे. त्यामुळे काँग्रेस येथे कुठली रणनीती आखणार, सत्ता कशी खेचून आणणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


























































