नवीन नोटांची हवाई सफर पडली महागात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

नोटाबंदीनंतर छापण्यात आलेल्या ५०० आणि दोन हजारच्या नोटा देशभरात पोहोचवण्यासाठी केंद्राने हवाई दलाची मदत घेतली. यासाठी हवाई दलाने २९ कोटी ४१ लाख शुल्क आकारले आहेत. देशभरात नोटा पोहोचवण्यासाठी हवाई दलाने सी-१७ आणि सी-१३० जे सुपर हक्युलस ही विमाने उपलब्ध करून दिली होती. ‘आरटीआय’ कायद्याखाली ही माहिती समोर आली आहे. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर छापखाने आणि टाकसाळीतून नव्या ५०० आणि २ हजारच्या नोटा देशभरात वितरीत करण्यात आल्या. त्यासाठी हवाई दलाच्या विमानांची मदत घेण्यात आली.

– सिक्युरिटी प्रिटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तसेच आरबीआयच्या मुद्रण प्राईव्हेट लिमिटेडकडून हे शुल्क आकारण्यात आले.
– नव्या नोटांच्या छपाईसाठी सरकारने २०१६-२०१७ साली हजार ९६५ कोटी रुपये खर्च केले.

‘नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वी योग्य ती काळजी घेतली असती तर केंद्र सरकारला हवाईद दलाची विमाने वापरावी लागली नसती. नोटांची ने-आण करण्यासाठी प्रवासी विमानांचा वापर करता आला असता.’

– लोकेश बत्रा, निवृत्त हवाई कमांडर