
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीकडेच राहणार आहे, मात्र त्यासाठी अद्याप कुणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतर हे पद भरण्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्री कोण यासाठी 22 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.



























































