
देवगड आठवडी बाजारात होणारी वाहतूक कोंडी ही नागरिकांसह वाहन चालकांची नेहमीचेच डोकेदुखी ठरत होती. वेळोवेळी वाहनचालक व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. उशिरा का होईना आता आठवडी बाजारात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सुटल्याने वाहनचालकांचे प्रवाशांनी समाधान व्यक्त होत आहे.
देवगड आठवडी बाजारात वाहतूक कोंडी नेहमीचेच दुखणे झाले होते. त्यातच पोलीस प्रशासनाकडून निष्क्रिय होमगार्ड दिले जात आहे. या आशयाखाली दैनिक सामनाने वृत्त प्रसिद्ध होतात देवगड पोलीस निरीक्षकांनी याची दखल घेत शुक्रवारच्या आठवडी बाजारात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्याने नगरपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग,न्यायालयाकडे जाणाऱ्या नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होत आहे.
मात्र, नागरिकांमधून एकच चर्चा होते की उशिरा का होईना पोलीस प्रशासनाला जाग आली, असा सवाल उपस्थित केला जात असला तरी होणाऱ्या वाहतूक कोंडी पासून मुक्ती मिळाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.





























































