साईचरणी चांदीचे ७ लाख ७५ हजार किंमतीचे सिंहासन दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधे  । शिर्डी 

नोएडा येथील साईभक्‍त प्रशांत श्रीवास्‍तव यांनी ७ लाख ७४ हजार ७२ रुपये किंमतीच्‍या २१ किलो ५०२ ग्रॅम वजनाच्‍या चांदीचे सिंहासन, फोटो फ्रेम व पाट संस्‍थानला देणगी दिली आहे. या वस्‍तुंची संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी विधीवत पुजा केली. यातील सिंहासन व फोटो फ्रेमचा वापर समाधी मंदिरातील श्रींच्‍या फोटोकरीता करण्‍यात येणार असून पाटाचा वापर मंदिरातुन दर गुरुवारी निघणा-या पालखीतील पादुका व सटका ठेवण्‍यासाठी करण्‍यात येईल.