
बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सिनेसृष्टीपासून खूप दूर असले तरी सोशल मीडियावर फारच सक्रिय असतात. त्यांच्या पोस्टला चाहते भरभरून प्रतिसाद देतात. गेल्या काही दिवसांपासून ते फार्महाऊसवरचे व्हिडीओ, फोटो शेअर करत आहेत.
नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांचे अनोखे ‘चक्की पिसिंग’ दिसत आहे. व्हिडीओमध्ये सायकलच्या चक्राला गिरणी जोडलेली दिसत आहे. यात धान्य आहे. धर्मेंद्र स्वतः धान्य दळताना दिसतात. हा व्हिडीओ शेअर करताना त्याला मजेशीर कॅप्शनही दिले आहे. ते म्हणाले, ‘सायकलिंग, सायकलिंग, सायकलिंग आणि चक्की पिसिंग, पिसिंग अँड पिसिंग’… सगळ्यांना माहीतच आहे ‘चक्की पिसिंग’ हा त्यांचा शोले चित्रपटातील डायलॉग आहे.



























































