
सामना ऑनलाईन, नांदेड
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर पदी दिक्षा धबाले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात भाजपच्या बेबीताई गुपिले यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीमध्ये जिल्हाधिकारी अरूण डोंगरे हे पीठासीन अधिकारी होती.
आज महापौर निवडीची प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी 15 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेणार नसल्याचे सांगितल्यानंतर हात उंचावून मतदान घेण्यात आले त्यात. मतदानामध्ये धबाले यांना ७० तर गुपीले यांना ४ मते मिळाली. नांदेड महानगरपालिकेमध्ये एकूण 81 नगरसेवक आहेत,ज्यातील 7 नगरसेवक अनुपस्थित होते. धबाले यांच्या निवडीमुळे 9 वर्षानंतर नांदेड दक्षिणमधील मतदारसंघातून महापौर निवडून आला आहे.































































