एटलीच्या सिनेमात लवकरच दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन झळकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘जवान’सिनेमाच्या दमदार यशानंतर आता प्रसिद्ध दिग्दर्शक एटली यांनी त्यांचा मोर्चा दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनकडे वळवला आहे. त्यांच्या आगामी सिनेमामध्ये अल्लू अर्जुन झळकणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र  अल्लू अर्जुनससोबत त्यांची बरीच चर्चा झाली असून दोघंही एकत्र काम करणार असल्याची चर्चा आहे.

एटली आणि अल्लू अर्जुन मागच्या काही दिवसांपासून एकमेकांसोबत काम करण्याची चर्चा सुरु आहे. 2024 च्या अखेरपर्यंत एटली या सिनेमाच्या शुटींगची सुरुवात करु इच्छित आहेत. त्याबाबत अल्लू अर्जुनशी बोलणे झाले आहे. त्याचा ‘पुष्पा 2 – द रुल’ सिनेमा पुढील वर्षी स्वातंत्र्यदिना दिवशी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या शेड्युलशी त्याच्या शुटींगच्या तारखाही अर्जुनला जुळणाऱ्या आहेत.  सुत्रांच्या माहितीनुसार जानेवारीच्या अखेरपर्यंत अभिनेता आणि दिग्दर्शक यांच्यात सिनेमाबाबतच्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील.