शालेय बुद्धिबळः कृती, ऋत्विक, कियारा, कार्तिक विजेते

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । वडाळा

मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या एमसीडीसीए जिल्हा शालेय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेमध्ये 12 वर्षांखालील गटात महिला कॅण्डिडेट मास्टर कृती पटेल व आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटू ऋत्विक कृष्णनने तर 14 वर्षांखालील गटात आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटू कियारा खातुरीया व कार्तिक चिन्नाम यांनी विजेतेपद पटकाविले. विजेत्यांना पुरस्कार आयडियल स्पोर्टस् अकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते, मुंबई बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांच्या उपस्थितीत देण्यात आला.

अकॅडमी ऑफ चेस ट्रेनिंगतर्फे आयडियल स्पोर्टस् अकॅडमी व आरएमएमएस सहकार्याने आयोजित शालेय बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेमधील 12 वर्षांखालील मुलींमध्ये महिला कॅण्डिडेट मास्टर कृती पटेलने शानाझ गांधीला निर्णायक साखळी फेरीत शह दिला आणि सर्व सामने जिंकून सहा गुणांसह प्रथम क्रमांक पटकाविला. विधी अगरवालने द्वितीय तर अनन्या दळवीने तृतीय क्रमांक मिळविला. 12 वर्षांखालील मुलांमध्ये सातव्या साखळी फेरीअखेर आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित सबज्युनियर बुद्धिबळपटू ऋत्विक कृष्णनने (7 गुण) अपराजित राहून प्रथम क्रमांक मिळविला.