दिव्यांगांना आधार देणारे ओसिओइंटिग्रेशन तंत्रज्ञान हिंदुस्थानात

277

अपघात किंवा अन्य कारणांमुळे हातापायासारखे महत्त्वाचे अवयव गमावलेल्या व्यक्तींना संजीवनी देणारे ओसिओइंटिग्रेशन तंत्रज्ञान हिंदुस्थानात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे दिव्यांगही त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहू शकतात. इतकेच नव्हे तर सर्वसामान्य माणसाप्रमाणे जीवन जगू शकतात. प्रॉस्थेटिकमध्ये आघाडीवर असलेल्या ऑटोबॉक कंपनीच्या सहाय्याने अस्थिव्यंगोपचार तज्ञ डॉ. आदित्य खेमका यांनी ओसिओइंटिग्रेशन तंत्रज्ञानाची सुरुवात केली आहे. ओसिओइंटिग्रेशन प्रक्रियेत रुग्णाच्या हाडामध्ये टिटॅनियम इम्प्लांटद्वारे कृत्रिम अवयवाशी मानवी शरीराचे बंध जोडले जातात. प्रॉस्थेसीस हा कृत्रिम अवयव अपंग व्यक्तीच्या थेट हाडाशी जोडला जातो. हे प्रॉस्थेसीस आवश्यकतेनुसार काढता येते आणि पुन्हा जोडता येते. थेट हाडाशी जोडलेले असल्याने प्रॉस्थेसीस वापरणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला जमिनीला स्पर्श केल्याचा अनुभव मिळतो.डॉ. खेमका आणि ऑटोबॉकचे आशिया-पॅसिफिक विभागाचे व्यवस्थापकीय संचालक बेरनार्ड ओकिफी यांनी या तंत्रज्ञानाची माहिती दिली. ओसिओइंटिग्रेशन तंत्रज्ञानाने प्रॉस्थेसीस लावलेल्या दिव्यांगाला सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सर्व कामे करता येतात. ते आयात करावे लागत असल्याने सध्या त्याचा खर्च दोन ते अडीच लाखांपर्यंत असल्याची माहिती देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या