सामाजिक बांधिलकीची दिवाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

108 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पाठारे प्रभू महिला समाजातर्फे 1916 सालापासून दिवाळी फंडासारखी योजना राबवण्यात येत आहे. या निधीतून पाठारे प्रभू समाजातील मुली-महिलांना  दिवाळीनिमित्त कपडे व मिठाई दिली जाते. यासाठी कार्यकारी समितीमधील भगिनी ज्ञातियांकडून दिवाळी फंड गोळा करतात. रविवार, 16 ऑक्टोबर रोजी ठाकुरद्वार येथे समाजाच्या शिवणवर्गात साडय़ा, ड्रेस मटेरियल व लाडू यांचे वाटप करण्यात आले आणि वैद्यकीय मदतही देण्यात आली. तसेच ज्ञातीतील दानशूर व्यक्तींकडून आलेली मदत देण्यात आली. प्रभादेवी चॅरिटेबल ट्रस्टकडून देवीच्या ओटीच्या साडय़ाही  देण्यात आल्या.