
सामना ऑनलाईन, मुंबई
मुंबईकर युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी आठ महिन्यांच्या तात्पुरत्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले आहे. कफ सिरप घेताना पृथ्वीच्या शरीरात उत्तेजक द्रव्य गेले. वाडाच्या नियमाखाली तो दोषी आढळला. त्यामुळे बीसीसीआयने त्याच्यावर ही कारवाई केली. मात्र या शिक्षेमुळे आता पृथ्वीला आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांना मुकावे लागणार आहे.
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी दरम्यान पृथ्वीच्या लघवीचा नमुना घेण्यात आला. 22 फेब्रुवारी 2019 साली इंदोर येथे ही चाचणी घेण्यात आली होती. यावेळी पृथ्वीच्या शरीरात टर्ब्युटलाईन या वाडाकडून प्रतिबंधित करण्यात आलेले द्रव्य आढळले. त्यानंतर बीसीसीआयने उत्तेजकद्रव्यविरोधी नियमाअंतर्गत अंतिम निर्णय घेतला.




























































